इतिहास आणि संस्कृती

ड्रॅगन पॅलेस विहार, कामठी, नागपूर: नागपूरजवळील कामठी येथे असलेले ड्रॅगन पॅलेस हे बौद्धांचे विहार असून, तथागत बुद्धाला ते अर्पण करण्यात आले आहे. हे विहार शिल्पकृतीचे असाधारण प्रतीक आहे. जपानच्या मदर नोरिको ओगावा सोसायटीने या विहारची स्थापना केली.

अद्वितीय कलाकृतीचे हे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेले नागपूरजवळच्या कामठी येथील हे सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. जपानच्या ओगावा सोसायटीच्या मॅडम नोरिको ओगावा यांनी ड्रॅगन पॅलेस विहारच्या बांधकामात मोठे आर्थिक योगदान दिले असल्याने नागपूर जिल्हा हा भारत—जपान मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. नागपूरचे लोटस मंदिर अशीही या विहारची ओळख आहे. हिरवळ, रंगिबेरंगी फुलांचा बगिचा आहे. यामुळे हा परिसर सुशोभित आणि आल्हाददायक झालेला आहे. या विहाराच्या िंभतींना पांढरा शुभ्र रंग देण्यात आला असून, तो शांतता, समानता आणि धर्माचे प्रतीक आहे.

The Dragon Palace Temple

ड्रॅगन पॅलेस विहार, कामठी, नागपूर

दीक्षा भूमी, नागपूर :जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.

भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.

जागेत बौद्धधमांची दीक्षा स्वीकारतात, ती जागा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एक म्हणजेदीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकाचेही हे मुख्य केंद्र आहे.

Diksha Bhumi

दीक्षा भूमी, नागपूर

बख्त बुलंद गोंड राजा जुन्‍या मध्‍यप्रातांत एके काळी गोंडाचे राज्‍य असल्‍यामुळे त्‍या भागाला गोंडवन हे नाव पडले. गोंड लोक अथवा जमात महाराष्‍ट्राच्‍या या भागात, म्‍हणजे व-हाडाकडीलभागात कशी आली आणि स्थिर झाली, हयाविषयी इंग्रज संशोधकांनी बरेच संशोधन केले आहे. त्यांाच्याड मते, यादवांचे राज्यि नष्टभ झाल्यािवर आंध्रमधून हे लोक उत्तकरेकडे आले. त्यांाचा शिरकाव प्रथम दर-याखो-यातझाला असला तरी हळूहळू त्यांमचे राज्यं खुप विस्ता.रले. गढा−मंडला येथील राणी दुर्गावतीच्याल काळी त्यांषचे राज्या विस्ता,रले होते. इ.स. 1953 सालच्याि मुघल सम्राट अकबराच्याग स्वादरीनंतर या राज्यााचे विभाजन झाले. यात चंद्रपूर आणि देवगड हया राज्यां9चा समावेश होता.

गोंड राजा केसरीशहाला पाच मुले होती. त्यांमची नावे ईस्मा्ईलशहा, दिनदारशहा, महितपशहा, छत्त रशहा व गुमनशहा अशी होती. महिपतशहा यांनाच बख्तंबुलंद या नावाने ओळखल्या‍ जाते.

बख्ताबुलंद चांगला राज्ये कर्ता निघाला. त्या ने भय्या राजमल कायस्थव यास दिवाण नेमले व रामाजी त्रिबंक कान्हेु यास मुलकी दप्तूर दिले. त्यातने उत्तार आणि पुर्वेकडून आपले राज्ये वाढविले. नागपूरच्याा आसपासच्याा खेडयांना त्या ने रस्याेा ने जोडले. त्या‍ अगोदर राजापूर बारसा नावाच्याा बारा वाडया होत्याू. त्यासने रस्तेय पाडून पेठा बसविल्याे. त्यालमुळे त्यााला नागपूरचा निर्माता असे मानण्याात येते. इ.स. 1702 मध्येच त्या्ने नवे नागपूर निर्माण केले. 12 टोल्यान (गांवे) होत्या . राजापूर, रायपूर, हिवरी, हरिपूर, वाठोडे, सक्कयरदरा, आकरी, लेंढरा, फुटाळा, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी ही गावे असून त्यापला राजापूर बारशा म्हाणत.

त्या च्याच कारकिर्दीत नागपूरची बरीच भरभराट झाली. त्याफनेच शुक्रवार तलाव खोदविला, तट तयार केला आणि राज्या्च्या सीमा वाढवल्यार.

Bakthbuland Saha

बख्तबुलंद गोंड राजा

कालिदास महोत्सव: रामटेक आणि नागपूर येथे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन दिवस कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुषंगाने हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात कालिदासांच्या सन्मानार्थ संगीत, नृत्य आणि नाटक सादर केले जाते. कालिदास हे भारताचे महान संस्कृत कवी आणि नाटककार होते. शकुंतला, कुमारसंभव आणि ऋतुसमहारा ही त्यांची प्रख्यात नाटकेे आणि मेघदूत ही त्यांची अतिशय लोकप्रिय कविता आहे. रामटेक परिसरातील चित्रकलाकृतींमुळे कालिदास यांना मेघदूत हे जगप्रसिद्ध साहित्य लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे म्हटले जाते.

कालिदास महोत्सवाच्या काळात संगीत, नृत्य आणि नाटके सादर केली जातात. या काळात विदर्भ प्रांताच्या सुवर्ण स्मृती ताज्या होत असतात. देशाच्या विविध भागांमधील लोक या महोत्सवात सहभागी होत असतात.

Kalidas Memorial, Ramtek

Kalidas Memorial, Ramtek

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रेशिमबाग : नागपूरच्या रेशिमबाग येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना क्रांतीकारी आणि डॉक्टर के. बी. हेडगेवार यांनी 1925 मध्ये केली होती. ब्रिटीश इंडियात हा एक सांस्कृतिक—सामाजिक गट म्हणून स्थापन झाला होता.

संघाचे स्वयंसेवक विविध राजकीय आणि सामाजिक कामकाजात सहभागी होत असतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वयंसेवक मदत व बचाव कार्यातही सहभागी होत असतात. याशिवाय, ते विविध धर्मदाय आणि शैक्षणिक कार्यातही ते योगदान देत असतात.

कस्तूरचंद पार्क : कस्तूरचंद पार्क हे नागपुरातील सर्वात मोठे बैठकीचे ठिकाण आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून अवघ्या एक किलोमंीटर अंतरावर ते आहे. हजारावर लोक बसू शकतील, एवढी त्याची क्षमता आहे. शहरात जेव्हा मोठ्या मिरवणुका काढण्यात येतात तेव्हा हे स्थळ अतिशय लोकप्रिय ठरत असते. या पार्कमधील मोकळी जागा पाहून येथे मोठ्या प्रमाणात व्यापार मेळा आणि प्रदर्शनी आयोजित करण्यात येत असते. या पार्कमध्ये वर्षभरच वेगवेगळे कार्यक्रम आणि मेळावे आयोजित केले जात असतात.

Kasturchand Park

कस्तूरचंद पार्क

नगरधन किल्ला, तालुका रामटेक :नागपूरच्या रामटेक तालुक्यात असलेल्या नगरधन या गावात हा किल्ला नागपूरच्या ईशान्येकडे 38 किलोमीटर आणि रामटेकच्या दक्षिणेकडे 9 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. नगरधन या जुन्या शहराची स्थापना सूर्यवंशी राजांनी केली आहे. नगरधन किल्ला हा या गावाचे वैशिष्ट्य असून, भोसले राजघराण्याचे राजा रघुजी भोसले यांनी हा किल्ला बांधला असल्याचे समजले जाते . या किल्ल्याच्या आतील भागात चौकोनी आकाराचा राजमहाल आहे. काही इमारतीही आहेत. या किल्ल्याच्या वायव्येकडील मुख्य द्वार अजूनही सुस्थितीत आहे.

Nagardhan Fort

नगरधन किल्ला, तालुका रामटेक

सीताबर्डी किल्ला : नागपुरातील सीताबर्डी किल्ला हा सीताबर्डी येथील 1817 च्या युद्धाचे प्रतीक आहे. नागपूरच्या मध्यभागी एका लहान टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. नागपूरचे राज्यकर्ते आप्पासाहेब उर्फ मुधोजी द्वितीय यांनी तिसर्या अँग्लो—मराठा युद्धाच्या काळात ब्रिटीशच्या ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढा सुरू करण्यापूर्वी हा किल्ला बांधला होता. हा परिसर टेकड्यांनी वेढलेला असून, तो आता सीताबर्डी या नावाने ओळखला जातो. हा परिसर नागपूरचे अतिशय महत्त्वाचे असे व्यावसायिक केंद्र आहे.

या किल्ल्यात ब्रिटीश सैनिकांचे थडगे आणि महात्मा गांधींना ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, तो सेल आहे. सध्या प्रांतीय लष्कराचे कार्यालय या किल्ल्यात आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन दिवशीच हा किल्ला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो.

Sitabuldi Fort

सीताबर्डी किल्ला

झिरो माईल : झिरो माईलचे चिन्हांकन नागपुरात असल्यामुळे, हे शहर भारताचे केंद्रिंबदू आहे. हे चिन्हांकन भारताच्या मध्यवर्ती बिंदूचे चिन्ह आहे.अंतर मोजण्यासाठी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी येथे झिरो माईल स्टोन उभारला होता. या झिरो माईल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेले आहे. विधानभवनाच्या नैऋत्येकडे ते आहे. नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती.

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती शहर आहे, असे समजून ब्रिटीश राज्यकर्त्यांनी हे ठिकाण निश्चित केले आणि तिथे झिरो माईल स्टोन उभारला. हे शहर देशाचे मध्यवर्ती शहर असल्याने नागपूरला दुसरे राजधानीचे शहर करण्याचीही त्यांची योजना होती.

Zero Mile

झिरो माईल

मारबत महोत्सव :मारबत महोत्सव हा केवळ नागपुराच साजरा होत असतो. दृष्ट प्रवृत्तींपासून शहराचे रक्षण करण्यासाठी हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवाच्या काळात नागपुरातील जनता दृष्ट राक्षसांचे पुतळे तयार करून त्यापासून शहराचे रक्षण करण्यासाठी आपल्या देवाची आराधना करीत असतात. हे पुतळे शहराच्या विविध भागांमधून निघणा-या मिरवणुकीच्या माध्यमातून मोकळ्या मैदानात नेण्यात येत असतात. आता आपले शहर सर्वच प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तींपासून सुरक्षित आहे, या श्रद्धेने मोकळ्या मेदानात या पुतळ्यांचे दहन करण्यात येते. या दिवशी लोक नवीन कपडे आणि वस्तूंची खरेदी करतात, तर महिला गोड वस्तू तयार करून त्यांचे वाटप करीत असतात. या महोत्सवाच्या काळात नृत्य, नाटक यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.

Marbat Procession

मारबत महोत्सव