पायाभूत सुविधा

ऊर्जा, बँक आणि उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा प्लॉट्स आणि शेड्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. उद्योगांच्या सर्वांगिण विकासाकरिता दळणवळण, दूरसंसार आणि प्रशिक्षण संस्था हे महत्त्वाचे घटक आहेत. कुठल्याही क्षेत्राच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा घटक हा तेथील पायाभूत सुविधाच असतो. याशिवाय, सामग्री आणि मनुष्य बळ हा घटकही तितकाच महत्त्वाचा ठरत असतो.

ऊर्जा

Power Supply : जिल्ह्यातील ओद्योगिक विकासाकरिता मूलभूत पायाभूत गरज म्हणजे वीज होय. नागपूर जिल्ह्यात 29 शहरे, 1874 गावे आहेत. 31 मार्च 2006 च्या अखेरीसपर्यंत सर्व शहरे आणि गावांचे विद्युतीकरण करण्यात आले होते. 2010—11 या वर्षाच्या काळात संपूर्ण नागपूर जिल्ह्यात 3676 दशलक्ष युनिट इतक्या विजेचा वापर करण्यात आला होता.

Table-E

Sr.No. Category of Electricity Consumption Consumption (Ten Lakh) Unit % of total
1. Domestic 1067 27.73
2. Commercial 242 6.29
3. Industrial 1725 44.84
4. Agriculture 238 6.20
5. Other 575 14.94
Total 3847

एनटीपीसी ऊर्जा प्रकल्प, मौदा

मोदा तहसीलच्या कुंभारी गावाजवळ असलेला हा प्रकल्प एनटीपीसीचा महाराष्ट्रातील पहिला ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात 500 मेगावॅटचे दोन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दुसर्या टप्प्यात 600 मेगावॅटचे आणखी दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाची एकूण क्षमता 2320 मेगावॅट इतकी होणार आहे.

प्रकल्प उभारण्याचा कार्यक्रम
टप्पा पहिला (2500 मेगावॅट)युनिट 1 — (500 मेगावॅट) — 8/4/2012 रोजी स्थापन करण्यात आला.युनिट 2 — (500 मेगावॅट) — मार्च 2013 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
दुसरा टप्पा (2600 मेगावॅट)
प्रकल्प उभारणीचा कार्यक्रम
युनिट 3 — (500 मेगावॅट) — मे 2016
युनिट 4 — (500 मेगावॅट) — नोव्हेंबर 2016

मोदा येथील प्रकल्पातून निर्मित होणार्या विजेचा पुरवठा पश्चिम भारतातील लाभार्थी राज्यांना केला जातो.

State ST I (MW) ST II (MW)
Maharashtra 370 500
Gujarat 240 294
Madhya Pradesh 156 212
Chhattisgargh 63 88
Goa 11 15
DNH 6 9
D and D 4 6
Unallocated 150 198
Total 1000 1320

कोराडी औष्णिक वीज प्रकल्प :

कोराडी औष्णिक वीज प्रकल्प हा नागपूरजवळील कोराडी येथे आहे. विदर्भातील चार प्रमुख ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक आहे. हा ऊर्जा प्रकल्प 1974 मध्ये कार्यान्वित झाला आहे. महाराष्ट्र सरकारचाच घटक असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडतर्फे (महाजेनको) हाताळल्या जाणार्या नऊ ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. कोराडी प्रकल्पात सात युनिट्स असून, त्यांची एकूण वीज निर्मितीची क्षमता 1080 मेगावॅट इतकी आहे. हे प्रत्येक युनिट 660 मेगावॅट क्षमतेचे आहेत.

खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प:

महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. महाजेनकोच्या कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सावनेर आणि डुमरी खुर्द खाणींमधून या प्रकल्पांना कोळसा उपलब्ध करण्यात येतो. या प्रकल्पाला लागणार्या पाण्याची आवश्यकता पेंच जलाशयातून पूर्ण केली जाते. हे पाणी कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या कालव्यातून पुरविले जाते. या प्रकल्पात चार युनिट्स असून, त्यांची वीज निर्मितीची एकूण क्षमता 840 मेगावॅट इतकी आहे. येथील प्रत्येक युनिटला 500 मेगावॅट क्षमतेचा बनविण्याचा प्रस्ताव आहे.

नागपुरात येऊ घातलेले खाजगी ऊर्जा प्रकल्प :

आयडिअल ऊर्जा प्रकल्प, बेला, नागपूर (270 मेगावॅट)
लेनेक्सिस ऊर्जा प्रकल्प, खुर्सापार, नागपूर (1320 मेगावॅट)
मंत्री पॉवर लिमिटेड, बेला, नागपूर (540 मेगावॅट)
विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर, बुटीबोरी, नागपूर (300 मेगावॅट)
अभिजित एमएडीसी नागपूर एनर्जी प्रा. लि., खैरे खुर्द, नागपूर (271 मेगावॅट)