वाहतूक

नागपूर मेट्रो रेल

Nagpur Junction Railway Station building

Nagpur Junction Railway Station building

महाराष्ट्र सरकारने नागपूर शहराकरिता जाहीर केलेला हा प्रकल्प आहे. दोन टप्प्यातील हा प्रकल्प 4400 कोटी आणि 3800 कोटी रुपये खर्चाचा आहे. या प्रकल्पांतर्गत सीताबर्डी ते मिहान आणि बुटीबोरी मार्गे विमानतळ असे 25 किलोमीटरचे अंतर आणि सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौक, कामठी असे 20 किलोमीटर इतके अंतर व्यापले जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे तज्ज्ञ सल्लागार नागपूरच्या या प्रस्तावित प्रकल्पाचा अभ्यास करीत असून ते आपला अहवाल लवकरच सादर करणार आहेत.

नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) पुढाकाराने या प्रकल्पासाठी मार्च 2012 मध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे. एनआयटी, नागपूर महानगर पालिका, महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळ यांच्या अधिकारांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नागपूर मेट्रो ट्रान्सपोर्ट कंपनी लिमिटेड या नव्या कंपनीतर्फे सुमारे 10 हजार कोटींचा हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ही कंपनी सध्या मिहान प्रकल्पाचा विकास करीत आहे. एमआयडीसी आणि सिडको या अन्य दोन भागीदार कंपन्या आहेत.

रस्ते

भारताचे दोन मुख्य राष्ट्रीय महामार्ग कन्याकुमारी—वाराणसी (महामार्ग क्रमाक 7) आणि हाजिरा—कोलकाता (महामार्ग क्रमांक 6) नागपुरातूनच जात असल्याने नागपूर हे महामार्गांचे मुख्य जंक्शन आहे. आणखी एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 हादेखील नागपूरला भोपाळजवळील ओबेदुल्लागंजने जोडला गेला आहे. याशिवाय, नागपूर हे दोन आशियाई महामार्गांचेही जंक्शन आहे. हे आशियाई महामार्ग म्हणजे एएच—43 (आग्रा ते मातारा, श्रीलंका) आणि एएच—46 (खडगपूर ते धुळे) आहेत.

नवा राज्य महामार्ग म्हणजे, नागपूर—औरंगाबाद—मुंबई एक्सप्रेस हायवे होय. राष्ट्रीय महामार्ग तत्वावर हा महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गालाही राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महामार्गाने राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला औरंगाबाद मार्गे जोडले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग 6 आणि महामार्ग 3 वरून या दोन शहरांचा प्रवास करण्यास लागणारा कालावधीही कमी झालेला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने कोल्हापूर ते नागपूर असा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 204 च्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली असून, यामुळे सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी ही शहरेही या मार्गाला जोडण्यात येणार आहे..

Public transport bus in Nagpur

Public transport bus in Nagpur

Nagpur Mahanagar Parivahan Ltd (NMPL) is the company formed with elected municipal corporators on board that caters to the city public transport. It has contracted Vansh Nimay Infraprojects (VNIL) to run city buses. It has a fleet of 470 Low-floor StarBuses that serve around 2.5Lakh citizens daily in the urban, suburban, metro areas. Of the total fleet 88 are low floor MiniBuses, and 382 are low floor 50 seater StarBuses. 240 buses are acquired under JNNURM and 230 are acquired under purchase-run-transfer basis by VNIL.

Maharashtra State road transport Corporation (MSRTC) runs cheaper transport service for intercity, interstate, interstate travel. It has two bus stations in Nagpur viz. Nagpur Bus Sthanak (CBS-1) at Ganeshpeth and MorBhawan (CBS-2) at Jhansi Rani Square, Sitabuldi

हवाई वाहतूक

Nagpur's Airport

Nagpur's Airport has the busiest Air traffic control room in India.

नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष हा भारतातील सर्वात व्यस्त कक्ष आहे. 2004 मध्ये नागपूरच्या आकाशातून दररोज 300 विमाने उड्डाण घेत असायची. ऑक्टोबर 2005 मध्ये नागपूरच्या सोनेगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे या विमानतळाचे नामकरण करण्यात आले.

नागपूर विमानतळावरून दररोज मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, इंदूर, अहमदाबाद, गोवा, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर आदी शहरांमध्ये एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गोएअर, स्पाईसजेट यासारख्या विमान कंपन्यांची विमाने उड्डाण घेत असतात. याशिवाय, एअर अरेबिया आठवड्यातून चार वेळा नागपूर ते शारजा या दरम्यान सेवा देत असते.

नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सोनेगाव येथे भारतीय हवाई दलाचे तळ आहे. येथे एमआय—8 आणि भारतीय हवाई दलाची आयएल—76 ही विमाने ठेवली जातात.

महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) स्थापना सिटी अॅण्ड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सीडको), नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआयडीसी), महाराष्ट्र राज्य मार्ग वाहतूक महामंडळ (एमएसआरटीसी) आणि नागपूर महानगर पालिका (एनएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. िंसगापूर येथील चांगी विमानतळाची या प्रकल्पाकरिता सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, भारतीय हवाई दलही आपल्या गजराज प्रकल्पासह मिहान परिसरात येण्याच्या तयारीत आहे.

भारताच्या रेल नेटवर्कसोबत कार्गोला जोडण्यासाठी भारतीय रेल्वेही मिहानजवळ आपले नवे स्थानक उभारणार आहे. यानंतर एमएडीसी विमानतळाकरिता महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) िंकवा भारतीय हवाई दलाचे (आयएएफ)चे नसणार. मुंबईजवळ सिडको शहर यशस्वीपणे वसविणार्या सिडकोची यासाठी निवड करण्यात आली आहे.

हा प्रकल्प जसजसा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तसतसे स्थलांतरितांची संख्याही वाढत असून, यामुळे नागपूरच्या लोकसंख्येतही वाढ होत आहे. शहरातील विद्यमान बससेवा इतक्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्यात सक्षम नसल्याने, एनएमसी, एनआयटी, एमएसआरटीसी आणि एमआयडीसीच्या संयुक्त सहकार्याने व्यापक अशी नवीन बस वाहतूक प्रणाली सुरू करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यात आला आहे. एनएमसी आणि एनआयटी नागपूर महानगरातील नागरी प्रशासनाची जबाबदारी सांभाळतील, तर एमएसआरटीसी आणि भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी पार पाडतील.