Close

जनसांखीकी

जनगणना लोकसंख्या टक्केवारी
1981 25,88,811
1991 32,87,000 26.96%
2001 40,67,637 23.74%
2011 46,53,171 14.39%
स्त्रोत: भारताची जनगणना

2011 च्या जनगणनेनुसार, 14 तालुकांचा समावेश असलेल्या नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 53 हजार 171 इतकी होती. यातील नागपूर शहराची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 911 इतकी होती. तर, उर्वरित जिल्ह्याची लोकसंख्या 24 लाख 5 हजार 421 इतकी होती. या जिल्ह्यातील स्त्रि—पुरुष प्रमाण एक हजार पुरुषांमागे 948 महिला असे होते. 2001 च्या जनगणनेनुसार हे प्रमाण एक हजारामागे 932 महिला इतके होते. 2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते. यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 93.76 टक्के आणि स्त्रि साक्षरतेचे प्रमाण 85.07 टक्के इतके होते. नागपूरच्या लोकसंख्येतील 52.5 टक्के लोकसंख्या 15 ते 59 वर्षे वयोगटातील आणि 10.35 टक्के लोकसंख्या सहा वर्षाच्या आतील वयोगटात होती.

2011 च्या जनगणनेनुसार, नागपूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी 68.30 टक्के लोकसंख्या जिल्ह्याच्या शहरी भागात राहात असल्याचे दिसून आले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, नागपूर जिल्ह्याच्या शहरी भागातील स्त्रि—पुरुष प्रमाण एक हजार पुरुषांमागे 951 महिला इतके होते, तर ग्रामीण भागात हेच प्रमाण एक हजार पुरुषांमागे 942 स्त्रियाअसे होते.