नागपूर हे महाराष्ट्राचे उपराजधानीचे शहर आहे. येथे दरवर्षी महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. नागपूर शहराची लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी असून या शहराला नुकताच स्वच्छ शहर व भारतातील दुसरे हिरवे शहर (ग्रीन सिटी) असे नामांकन मिळाले आहे.नागपूर शहर हे “संत्रा नगरी”
या नावाने सुद्धा प्रसिध्द आहे. येथील संत्रे संपूर्ण भारतात व विदेशात निर्यात होतात. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा ‘बख्त बुलंद’ याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली. नागपूर शहर हे भारताच्या मध्यावर असून येथील ‘झीरो माईल मार्कर’ ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शविते. नागपूर जिल्हयात १४ तालूके असून १२ विधानसभा मतदार संघ आहेत.