Close

मिहान

राज्‍यातील प्रादेशिक असमतोल दूर करण्‍याच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट शासनाने नागपूर येथे आंतरराष्‍ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ (मिहान प्रकल्‍प) विकसीत करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या संयुक्‍त प्रकल्‍पांतर्गत नागपूर येथे अस्तित्‍वात असलेल्‍या विमानतळाचा एक आंतरराष्‍ट्रीय बहुविध प्रवासी व मालवाहतूक हब विमानतळामध्‍ये विकास करण्‍याबरोबरच विमानतळालगतचा परीसर विशेष आर्थ्कि क्षेत्रामध्‍ये (स्‍पेशल इकॉनॉमिक झोन-एसइझेड) विकसीत करावयाचा आहे.

विशेष आर्थिक क्षेत्र (स्‍पेशल इकॉनॉमिक झोन-एसइझेड):

मिहान प्रकल्‍पांअंतर्गत सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या विमानतळा लगतच्‍या अंदाजे 2000 हेक्‍टर परीसरात एमएडीसी भव्‍य विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करीत आहे. आर्थिक उलाढालीचा विकास करण्‍याच्‍या दृष्‍टीने तयामध्‍ये नियातीशी निगडीत माहिती तंत्रज्ञान उद्दोग सौंदर्य प्रसाधने व दागिने, वस्‍ञोदृोग, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, औषधे, अन्‍न धान्‍य प्रकिया, उदृोग आणि अशाच स्‍वरुपाच्‍या अन्‍य उदृोगाचा समावेश आहे. त्‍यामध्‍ये समारे 900 ट्रक एकाचवेळी ठेवता येतील एवढा वाहनतळ, मोठे भांडारग़ृह शीतसाठा खुले गुरांचे गोठे असलेला विस्‍तीर्ण थांबा आणि त्‍यालगतच ज्‍यावरुन एकाचवेळी दोन रेल्‍वे धावू शकतील अशी रेल्‍वे लाइनची ही सुविधा आहे.
अशाप्रकारे मिहान हा विमानतळ, रस्‍तेविकास, रेल्‍वे विकास, विशेष आर्थिक क्षेञ आणि त्‍याबरोबरच निगडीत विविध सेवा सुविधा उदा. गृहनिर्माण आरोग्‍यदायी निवास व्‍यवस्‍था, आंतरराष्‍ट्रीय शाळा आणि अन्‍य यांचा समावेश असलेला संयुक्‍त प्रकल्‍प आहे.

विशेष आर्थिक क्षेत्र (एसइझेड) पायाभूत सुविधा

 • सहापदरी, चारपदरी, तीनपदरी व दोनपदरी रस्‍त्‍यांचे जाळे
 • कला- दूरसंचारण विस्‍तार
 • रहिवासी/बिगर रहिवासी कारणाकरीता पाणीपूरवठा व्‍यवस्‍था (100 एमएलडी क्षमतेची)
 • सांडपाण्‍याची निचरा व्‍यवस्‍था
 • 246 मेगावॅटचा व 25 एम डब्‍ल्‍य डिझेल बॅकअपचा विदृूत पकल्‍प
 • करमणुकीची साधने- बहुविध चित्रपटगृह, गोल्‍फ कोर्स, पत्‍यांचा क्‍लब
 • मिहान प्रकल्‍पाअंतर्गत काम करणा-या नोकरवर्गासाठी राहण्‍याची सुविधा
 • सांस्‍कृतीक व प्रदर्शनीय केंन्‍द्र, मुल्‍यवर्धक व आर्थिक सेवा केंन्‍द्र
 • प्रकल्‍पासाठी खर्च –अंदाजे रु 2581 करोड (सन 2002 च्‍या दरानुसार)
 • आगामी 5 वर्षातील गुंतवणूक सुमारे – 20,000 करोड
 • मिहान प्रकल्‍पाव्‍दारे सन 2020 पर्यंत निर्माण होणारी प्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती- सुमारे 1,20,000 नोक-यांचेी संधी
 • आगामी 10 वर्षातील अप्रत्‍यक्षरित्‍या निर्माण होणारा रोजगार सुमारे 2,40,000 ते 3,60,000 नोक-यांची संधी

एमएडीसी ने विशेष आर्थिक क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा पूर्ण केलेल्‍या आहेत. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे. :

विशेष आर्थिक क्षेत्रामध्‍ये एम ए डी सी ने रस्‍ते, पाणीपुरवठा व्‍यवस्‍था, विद्दूत संचारण व वितरण व्‍यवस्‍था, सांडपाणी निचरा व्‍यवस्‍था, दूरध्‍वनींच्‍या तारांचे जाळे, अग्निशामक केंन्‍द्र, मध्‍यवर्ती सुविधा केंन्‍द्र, आणि इतर निगडीत सोयी सुविधा पूर्ण केलेल्‍या आहेत. विद्दूत प्रकल्‍पांचे काम ए एम एन इ पी एल या कंपनीस देण्‍यात आलेले आहे. एम ई आर सी यांनी महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीच्‍या वितरण परवान्‍यास मान्‍यता दिली आहे. एम ई आर सी कडील कराबाबतच्‍या विनंती अर्जास मान्‍यता मिळताच येत्‍या दोन महिन्‍यात विद्दूत पुरवठा सुरु होईल.
मिहान प्रकल्‍पांतर्गत पायाभूत सुविधांसाठी रु 800 करोड तर सुमारे 2865 हे. भूसंपादनासाठी रु 300 करोड खर्च करण्‍यात आला असून विद्दूत प्रकल्‍पाच्‍या उभारणीसाठी सुमारे 1400 करोड रु.खर्च करण्‍यात आला.

महाराष्‍ट्र विमानतळ विकास कंपनीने विशेष आर्थिक क्षेत्रातील जमिन खालील कंपन्‍यांना दिली आहे

अ.क्र कंपनीचे नाव क्षेत्रफळ (एकरमध्‍ये)
1. महिंन्‍द्र सत्‍यम् 130.182
2. कोल लॅड डेव्‍हलपर्स लि. 100
3. एल अॅण्‍ड टी इन्‍फोसिटी 50.85
4. विपुल अॅण्‍ड करमचंद 50
5. अंबुजा रियालीटी 27.852
6. ईकोवर्ल्‍ड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर 27.852
7. डिएलएफ 140.21
8. एचसीएल टेक्‍नॉलॉजीस 140
9. विप्रो टेक्‍नॉलॉजीस 117
10. ताजसाटस इंडस्‍ट्रीज 2.651
11. इंदू प्रोजेक्‍ट्स/आसरा रियालीटी 25
12. इंदू प्रोजेक्‍ट्स/आसरा रियालीटी 1.5
13. मॅक्‍स अॅरो स्‍पेस 14.82
14. झेटा सॉफ्टेक 1
15. ए डी सी सी इन्‍फोकॅड 1
16. पॅरामाऊंट कन्‍डक्‍टर्स 1.7
17. मनमोहन इंटरनॅशनल 1
18. दयालू दाल अॅण्‍ड ऑईल मिल 1
19. सोनी पॉलीमर्स 1
20. झीऑन सोल्‍यूशन्‍स् 1
21. टी सी एस 53.910
22. एअर इंडिया (बोईग इन्‍क) 50
23. मे.कॅलीबर पाईंट 5
24. मे.हेक्‍सावेअर 15
25. मे.लिला वेंचर्स 3
26. मे.लिपी इंटरनॅशनल 1
27. मे.लोकमंगल इन्‍फ्रोटेक 1
28. मे.ब्‍ल्‍यू प्‍लॅनेट 1
29. आय टी शास्‍त्र 1
30. राजतरु स्‍टूडिओ 2.441
31. डयूक्‍स 36.5
32. टी ए एल 30
33. केनोस्‍पेअर 1
34. गम फार्मा 5
35. हेल्‍थ्‍ सिटी 74
36. हल्‍दीराम 1.268
37. बी पी सी एल एटीएफ फॅसीलीटी 15
38. गुरु देव दत्‍त 1
39. इंफोसीस 142.176
40. लुपीन फार्मा 24.654
41. जेनेटिक इंजिनियरिंग सर्विसेस लिमि. 1
42. कनव अॅग्रोनॉमि 2.5
43. लाईट हाऊस इन्‍फोसिस्टिम प्रा.लि. 1
44. सैफ हेल्‍थ रेमिडीस प्रा.लि. 1
45. अभिजित एम ए डी सी एनर्जी प्रा.लि. 15.574
46. स्‍मार्ट डाटा 1.753
47. येलामंचली सॉफ्टवेअर 1.556
48. झिम लॅबोटरीज 2.5

खालील कंपन्‍यांनी उत्‍पादन व निर्यात सुरु केली आहे.

अ.क्र कंपनीचे नाव कामाचे स्‍वरुप कार्यरत मनुष्‍यबळ
1. मे.कॅलिबर पॅाईन्‍ट बिझनेस सोल्‍यूशन बिपीओ 550
2. मे.इबिक्‍स सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर सोल्‍यूशन 125
3. मे.क्‍लाउडाटा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर सोल्‍यूशन 50
4. मे.येलामंचीली सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर सोल्‍यूशन 15
5. मे.इंन्‍फॉरमॅटीक्‍स सोल्‍यूशन सॉफ्टवेअर सोल्‍यूशन 5
6. मे.सिनोस्फिअर इंडिया प्रा.लि. सिनोस्फिअर 25

सन 2011-12 मध्‍ये अंदाजे रु.70 करोडची निर्यात करण्‍यात आली असून सुमारे 1000 लोकांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍यात आला.
मेसर्स ताल मॅन्‍युफॅक्‍चरींग सोल्‍यूशन्‍स या कंपनीने फ्लोअर बिम्‍स व बोईंग विमानाच्‍या इतर भागाचे प्रायोगिक तत्‍वावर उत्‍पादन सुरु केले आहे.

खालील कंपन्‍यांनी विशेष आर्थिक क्षेत्रामध्‍ये बांधकाम सुरु केले असून त्‍याव्‍दारे निर्माण झालेला रोजगार खालीलप्रमाणे

  • डायट फुड्स इंटरनॅशनल(मे.दयालू दाल अॅण्‍ड ऑईल मिल नागपूर).-50
  • कोल लॅण्‍ड डेव्‍हलपर्स लिमिटेड -60
  • कनव अॅग्रोनॉमि- 60
  • बोईंग इन्‍स (एअरइंडिया एम आर ओ)- 2200
  •  महिंन्‍द्रा सत्‍यम-60
  • लुपीन फार्मा-60
  • टाटा कन्‍सलटन्‍सी (टीसीएस)मुंबई -500

  विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील जमिनीचे खालील कंपन्‍याना वाटप करण्‍यात आले आहे.

  भाडांरगृहाकरीता हेक्टर
  गती लिमिटेड 9.0
  टी सी आय इंन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर लि. 9.0
  एकूण 18.00
  निवासी कारणाकरीता
  एचसीएल टेक्‍नालॉजीज 30.00
  महिंन्‍द्रा बेबॅन्‍को डेव्‍हलपर्स लिमि. महिंन्‍द्रा लाईफस्‍पेस गृहनिर्माण 25.73
  एकूण 55.73
  इतर सुविधांकरीता
  अतुल शिरोडकर अॅण्‍ड असोसिायट्स आर एम सी प्राप्‍ॅडक्‍ट लि.मुंबई 6.00
  भारत पेट्रोलियम कोर्पोरेशन लि. 0.927
  भारत पेट्रोलियम कोर्पोरेशन लि. 10.035
  डेक्‍कन कार्गो अॅण्‍ड एक्‍सप्रेस लॉजीस्‍टीक्‍स प्रा.लि. 50.00
  सिकल लॉजीस्‍टीक्‍स लि. (एन एण्‍सजीआर टी एल)रेल टर्मिनल (जेव्‍ही) 66.498
  सिकल लॉजीस्‍टीक्‍स लि. (एन एण्‍सजीआर टी एल)रेल टर्मिनल (जेव्‍ही) 148.29
  योजना रियालीटीज प्रा.लि मुंबई – हॉटेल 10.00