समानतेसाठी धावा – नागपूर महिला मॅरेथॉन
प्रारंभ : 13/03/2022 शेवट : 13/03/2022
ठिकाण : कस्तुरचंद पार्क
महिला महामॅरेथॉनसाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी
Ø प्रत्येक गटासाठी १० पुरस्कार
Ø स्वयंसहायता व फन रन साठीही पुरस्कार
Ø माय-लेकीच्या ‘ब्रेक द बायस’ लढा
Ø नागपुरात ५० हजाराचा समुदाय धावणार
नागपूर दि. 8 : ‘ब्रेक द बायस’ अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी 13 मार्चला नागपुरात 5 किलोमिटर मॅराथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन मोफत नोंदणीसाठी आज जिल्हा प्रशासनाने लिंक जाहीर केली आहे. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अधिकाधिक संख्येने घराघरातील मायलेकीने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने आज यासंदर्भातील लिंक जारी केली आहे. या लिंकवर गेल्यानंतर या स्पर्धेतील आपली नोंदणी होणार आहे. 5 किमी, 3 किमी, 2 किमी तीनही गटांसाठी प्रत्येकी 10 बक्षिसे जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्हयातील सर्वांना सहभागी होता येणार आहे. यासाठी लिंक पुढील प्रमाणे आहे.
https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6
ही मॅरेथॉन स्पर्धा कस्तुरचंद पार्क येथून सुरू होऊन संविधान चौक, विधानभवन रस्त्याने, जपानी गार्डन, वॉकर स्ट्रीट, रामगिरी, जिमखाना, व्हीसीए चौक या 5 किलोमीटरच्या मार्गाने होईल. स्पर्धेचा समारोप कस्तुरचंद पार्क येथेच चौकात होईल.
‘ब्रेक द बायस’ , ‘रन फॉर इक्वॅलिटी’ तसेच वाढत्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सीट बेल्ट व हेल्मेट वापरा, स्पीडवर नियंत्रण ठेवा या संदेशासह ‘रन फॉर सेफ्टी ‘ वर आधारित फक्त महिलांसाठी ही स्पर्धा असेल. सकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये हे आयोजन असेल. जिल्हा प्रशासनाला
https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6
यावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. मॅरेथॉन स्पर्धेत शाळेमधील 8,9 व 11 व्या वर्गातील फक्त मुली व त्यांच्या माता सहभागी होतील, तसेच महाविद्यालयीन तरुणींना देखील यामध्ये सहभागी होता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिली.