Close

भारतीय स्वातंत्र दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पोलीस विभागाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली. डॉ. इटनकर यांनी यावेळी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.