Close

खेकरा नाला

नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या खाप्रा येथील खेकरा नाला हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खापाजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणा-यांसाठी विशेषत: पर्वतरोहकांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे, खेकरा नाला धरणाच्या सभोवताल असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, सभोवताल असलेले घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे होय. हे सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील पर्यटक येथे येत असतात. यामुळेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉंजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  • खेकरानाला तलाव
  • नागपूरमधील खेकरानाला  तलाव

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ नागपुर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक नागपूर आहे