Close

सातपुडा बॉटनिकल गार्डन

नागपूरच्या फुटाळा तलावाजवळील सेमिनरी हिल्स भागात असलेले सातपुडा बॉटनिकल गार्डन हे अतिशय अदभुत गार्डन असून, हजारो लोकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रिंबदू ठरले आहे. सिटी सेंटरच्या ईशान्येकडे असलेल्या या सातपुडा बॉटनिकल गार्डनमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करणार्यांसाठी हे गार्डन अतिशय उपयुक्त ठिकाण आहे. कारण, येथे विविध वनस्पतींची महत्त्वूपर्ण माहिती उपलब्ध आहे. सातपुडा गार्डन आणि आसपासच्या परिसराच्या आल्हाददायक वातावरणात पक्षी तर आहेतच, तरुण जोडपीही वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

  • सातपुडा बोटॅनिकल गार्डन
  • सातपुडा बोटॅनिकल गार्डन

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ नागपुर आहे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक नागपूर आहे