Close

भूगोल व हवामान

नागपूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग िंछदवाडा आणि मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्याने व्यापलेला आहे आणि पूर्वेला भंडारा जिल्हा आहे. दक्षिण आणि पश्चिमेकडे अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा आहे. तर, वायव्येचा काही भाग अमरावती जिल्ह्याने व्यापलेला आहे.

नागपूर जिल्ह्यात नैसर्गिक आणि मावननिर्मित तलाव आहेत. यात अंबाझरी तलाव हा सर्वात मोठा आहे. अन्य नैसर्गिक तलावांमध्ये गोरेवाडा आणि तेलंगखेडी तलावाचा समावेश आहे. सोनेगाव आणि गांधीसागर हे तलाव मनुष्यनिर्मित असून, शहरातील ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी त्यांची निर्मिती केली आहे. नाग नदी, पिली नदी आणि काही नाले हे शहराकरिता सांडपाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग आहेत. हिरवेगार शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. छत्तीसगडनंतर भारतातील दुसरे सर्वाधिक हिरवेगार आणि स्वच्छ शहर म्हणून नागपूरला मान्यता देण्यात आली आहे. नागपूर शहर हे नैसर्गिक संसाधनांनंी समृद्ध आहे. कृषी क्षेत्रासोबतच सोयाबिन, जवार आणि खनीज संपत्तीचे विपूल साठे या जिल्ह्यात आहेत. सागवन आणि गवताचे सर्वात मोठे उत्पादन नागपूर जिल्ह्यात होत असते. याशिवाय, मँगनिजचे मोठे साठेही या जिल्ह्यात आहेत.

हवामान

बंगालचा उपसागर आणि अरेबिअन समुद्रापासून दूर असलेल्या भारतीय द्विपकल्पाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराचे हवामान आर्द्र आणि कोरडे आहे. या शहरात वर्षातील बहुतांश काळ कोरडेच हवामान असते. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात नागपुरात 1205 मिमी इतका पाऊस पडत असतो. 14 जुलै 1994 रोजी या शहरात एकाच दिवशी 304 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. मार्च ते जून या उन्हाळ्याच्या काळात उनही तितकेच तापत असते. मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ हिवाळ्याचा असतो. हिवाळ्यात 10 अंशपर्यंत तापमान खाली येत असते. 29 मे 2012 रोजी या शहरात 48.6 अंश सेल्सिअस इतक्या महत्तम तापमानाची आणि 1937 मध्ये 3.9 अंश इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.

नागपूर जिल्ह्यात सरासरी 1064.1 मिमी इतका सरासरी पाऊस पडत असतो. उमरेड, कुही आणि भिवापूर तहसिलीत सर्वाधिक पाऊस होतो, तर जिल्ह्यातील अन्य तहसिलींच्या तुलनेत काटोल आणि नरखेड तहसिलींमध्ये कमी पाऊस होतो.

नागपूर – हवामान तक्ता

J F M A M J J A S O N D
10 12 18 13 16 172 304 292 194 51 12 17
31 34 38 42 45 40 34 32 34 35 32 30
10 13 17 22 24 26 22 22 21 18 13 10
सरासरी कमाल आणि किमान मध्ये तापमान °C वर्षाच्या अखेरीस पाऊस मिमी . स्त्रोत: जागतिक हवामान माहिती सेवा
J F M A M J J A S O N D
0.4 0.5 0.7 0.5 0.6 6.8 12 11 7.6 2 0.5 0.7
87 93 101 108 112 104 92 90 93 94 90 86
51 55 63 71 79 76 72 71 70 64 55 50
सरासरी कमाल आणि मि ° फॅ तापमान
वर्षाव इंचामध्ये

नागपूर हवामान डेटा

महिना जाने फेब मार्च एप्रिल मे जून जुलै ऑग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर Year
उच्च रेकॉर्ड °C (°F) 34.1
(93.4)
37.6
(99.7)
41.4
(106.5)
45.8
(114.4)
47.1
(116.8)
46.4
(115.5)
38.5
(101.3)
35.8
(96.4)
38.0
(100.4)
37.1
(98.8)
35.4
(95.7)
33.5
(92.3)
47.1
(116.8) s
सरासरी उच्च °C (°F) 28.7 (83.7) 31.2 (88.2) 36.2 (97.2) 40.7 (105.3) 42.4 (108.3) 37.5 (99.5) 31.6 (88.9) 30.5 (86.9) 32.3 (90.1) 32.7 (90.9) 30.4 (86.7) 28.1 (82.6) 33.53 (92.35)
दैनिक औसत °C (°F) 20.8 (69.4) 23.2 (73.8) 27.7 (81.9) 32.5 (90.5) 35.1 (95.2) 31.9 (89.4) 27.9 (82.2) 27.1 (80.8) 27.7 (81.9) 26.4 (79.5) 23.0 (73.4) 20.4 (68.7) 26.98 (80.56)
कमी सरासरी °C (°F) 12.9 (55.2) 15.1 (59.2) 19.2 (66.6) 24.3 (75.7) 27.8 (82.0) 26.3 (79.3) 24.1 (75.4) 23.6 (74.5) 23.1 (73.6) 20.0 (68.0) 15.5 (59.9) 12.6 (54.7) 20.38 (68.68)
कमी नोंद °C (°F) 6.3 (43.3) 7.9 (46.2) 9.9 (49.8) 17.3 (63.1) 20.6 (69.1) 20.8 (69.4) 19.3 (66.7) 20.5 (68.9) 16.4 (61.5) 12.4 (54.3) 6.8 (44.2) 5.5 (41.9) 5.5 (41.9)
मिमी इंच 16 (0.63) 22 (0.87) 15 (0.59) 8 (0.31) 18 (0.71) 168 (6.61) 290 (11.42) 291 (11.46) 157 (6.18) 73 (2.87) 17 (0.67) 19 (0.75) 1,094 (43.07)
% आर्द्रता 54 43 30 24 27 55 77 80 74 61 55 56 53
सरासरी पावसाचे दिवस 1.8 2.2 1.9 1.2 2.9 11.4 17.5 16.5 10.4 4.0 1.3 1.1 72.2
सरासरी सूर्यप्रकाश तास 272.0 268.3 287.6 290.8 293.8 186.6 115.4 116.7 182.5 260.4 264.1 268.8 2,807
स्त्रोत: एनओएए (1971-1990)