महत्वाची ठिकाणे
भेट देण्यासारखी स्थळे
Religious :
नवेगाव येथील कुंवारा भिवसेन बाबा मंदिर :नागपूर जिल्ह्याच्या पारसिवनी तहसीलमध्ये हे मंदिर आहे. मध्य भारतातील गोंड िंकवा अन्य आदिवासी समाज आणि इतकेच काय, तर िंहदू भाविकांची पावलेही चैत्र महिन्यात या मंदिराची वाट धरत असतात. गोंड आदिवासींचे चौथे धर्मगुरू असलेले कुंवारा भिवसेन बाबा यांचा हा जयंतीचा काळ असल्याने त्यांच्या या मंदिराकडे चेत्र महिन्यात दररोजच हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. मनातील इच्छा पूर्ण झालेले भाविक येथे वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्सव साजरे करीत असतात. यात ढोल वाजवून नृत्य करणे, जनावरांचा बळी देणे आणि मांसाहाराचे जेवण शिजवून ते प्रसाद म्हणून खाणे आदी परपंरांचा यात समावेश आहे. या मंदिरात चैत्र महिन्यात भव्य भिवसेन जत्रा भरत असते. पेंच जलाशयाच्या किनार्यावर असलेल्या या मंदिरातील जत्रेच्या काळात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक येथे येत असतात. भिवसेन हे भगवान महादेवाचे अंश आहेत, असा गांेंड समाजाचा विश्वास आहे.
नवेगाव येथील कुंवारा भिवसेन बाबा मंदिर
सती अनुसया माता मंदिर, पारडिंसगा :श्री वैदेही सती अनुसया माता यांचा जन्म 5 मे 1926 रोजी काटोल तहसिलीच्या पारडिंसगा येथील माता अनाई आणि पिता रामजी यांच्या घरी पाचव्या कन्येच्या रूपात झाला. पारडिंसगातील नागरिकांसोबत राहताना, त्यांच्यासोबत खेळताना, गाणी म्हणताना अनुसया माता यांनी त्यांच्यावर सहा दशके प्रेम केले, त्यांना आपुलकी दिली, त्यांची सर्व दु:खे नष्ट केली, त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि प्रत्येेक कुटुंबातील प्रमुख म्हणून त्यांनी कर्तव्य पार पाडले. अनुसया मातेच्या हृदयात प्रत्येकांविषयी असलेलेे प्रेम पाहून पारडिंसगावासियांना कधीच दुसर्या कोणत्याही देवाची गरज भासली नाही. त्यांनी माता अनुसयाचेच मंदिर गावात बांधले.
सती अनुसया माता मंदिर, पारडिंसगा
गुरुद्वारा िंसग सभा, कामठी रोड, नागपूर:नागपूरच्या उत्तरेकडे तीन किलोमीटर अंतरावर कामठी मार्गावरील गुरुद्वारा िंसग सभा हे शहरातील सर्वात जुने गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाराची वास्तू संगेमरमरने बांधण्यात आली असून, 12 हजार चौरस फुट जागेत भोजनाची व्यवस्था आहे. येथील स्वयंपाकघर अतिशय अत्याधुनिक आणि स्वच्छ आहे. मुख्य दिवानखाना 14 हजार चौरस फुटाचा असून, तो पूर्णपणे संगेमरमरचा आहे. गुरुद्वाराचे मुख्य द्वार 30 फूट उंच आहे. भेेटीस येणार्यांसाठी 15 खोल्या असून, गुरुद्वाराच्या वरच्या मजल्यावर सेवाभावी लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.
गुरुद्वारा िंसग सभाच्या अस्तित्वामागे एक इतिहास आहे. 1885 मध्ये नागपुरात स्थायी झालेली एक धार्मिक व्यक्ती सरदार बुध िंसग यांनी 1915 मध्ये गुरुद्वाराची मुख्य इमारत बांधली. 1927 मध्ये काही शिख कुटुंब पंजाबहून स्थलांतरित होऊन नागपूरात स्थायीक झाले. त्यांनी रेल्वे अभियंता असलेले निर्मल तेजसिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबी लाईन भागात आणखी एका गुरुद्वाराचंी निर्मिती केली. 1948 च्या काळात दोन्ही गुरुद्वारा एकाच व्यवस्थापनाअंतर्गत आणण्यात आले. 1998 मध्ये या गुरुद्वारांचे नूतनीकरण करून त्याचा विस्तार करण्यात आला आणि त्याला गुरुद्वारा श्री गुरू िंसग सभा असे नाव देण्यात आले.
गुरुद्वारा िंसग सभा, कामठी रोड, नागपूर
बोहरा मशिद, नागपूर :कलाकृतीची असाधारण वास्तू असलेली बोहरा मशिद डोळ्यांचे पारणे फेडणारी अशीच आहे. नागपूरच्या शांतीनगर भागात ही मशिद आहे. इतवारी भागात असलेली ही मशिद मूळची नागपूरच्या दाऊदी बोहरा समाजाची आहे. या समुदायाचे सदस्य हे इस्लामची उपशाखा असलेल्या बोहराशी संबंधित आहेत. इस्लामवर विश्वास ठेवणारे जगभरातील असंख्य लोक प्रत्येक शुक्रवारी या मशिदीत नमाजासाठी एकत्र येऊ लागले. मशिदीच्या संकुलात समुदायासाठी भव्य सभागृह आहे. या समुदायाच्या महोत्सव, लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांसाठीही या सभागृहाचा वापर होत असतो.
बोहरा मशिद, नागपूर
हजरत ताजुद्दिन बाबा दर्गा, नागपूर : ताजुद्दिन बाबा (21 जानेवारी 1861 ते 17 ऑगस्ट 1925) हे सुफी गुरू होते. त्यांचे अनुयायी त्यांना सद्गुरू या नावाने ओळखायचे. ते नागपुरात राहात होते. ताजुद्दिन हे तरुण वयातच अनाथ झाले. आजी आणि काका अब्दुल रेहमान यांनी त्यांचा सांभाळ केला. नागपूरजवळील कामठी येथे असलेल्या मदारशात ते सहभागी झाले. तिथे त्यांची भेट हजरत अब्दुल्ला शाह यांच्यासोबत झाली. त्यांनी ताजुद्दिन यांना धार्मिक मार्ग दाखविला. शाह यांनी त्यांना सुकामेवा खायला दिला आणि ‘कमी खा, कमी झोपा, कमी बोला व कुराण वाचा’ हा मंत्र दिला. शाह यांच्या वास्तव्यात ताजुद्दिन यांना नवा अनुभव मिळाला, नवी दिशा मिळाली. ते स्वत:लाही विसरून गेले. यानंतर युवाकाळात ताजुद्दिन अवलियासारखेेच वागू लागले. त्यांनी आपल्या अंगातील वस्त्रेही काढून टाकली.त्यावेळी एका ठिकाणी ब्रिटीश पोलो हा खेळ सुरू होता. ताजुद्दिन तिथपर्यंत विवस्त्रावस्थेत गेले. या स्पर्धेत सहभागी असलेल्या ब्रिटीश महिलांना त्यांना या अवस्थेत पाहून धक्का बसला आणि त्यांना वेडा समजून नागपुरातील मानसिक उपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. या रुग्णालयात ते संत म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांची ही ओळख रुग्णालयाच्या बाहेरपर्यंत गेली. मोठ्या संख्येत लोक ताजुद्दिन बाबांच्या दर्शनासाठी रुग्णालयात येऊ लागले. कालांतराने त्यांना माफ करण्यात आले आणि महाराज रघुजी भोसले यांनी त्यांना रुग्णालयातून बाहेर आणले आणि आपल्या महालात नेले. भोसले यांनी सक्करदरा येथील आपली लाल कोठी ताजुद्दिन बाबांना अर्पण केली. ताजुद्दिन बाबा आजही मुस्लिम आणि िंहदू या दोन्ही समाजासाठी पूज्यनीय आहेत.
हजरत ताजुद्दिन बाबा दर्गा, नागपूर
तेलनखेडी शिव मंदिर, नागपूर : भगवान शिवशंकराचे असलेले हे शिवमंदिर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या अगदी समोर आहे. शिवभक्तांसाठी हे मंदिर प्रख्यात धार्मिक स्थळच बनले आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावरच नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम लहान असले, तरी मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय आकर्षक आहे. हे मंदिर फार प्राचिन आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होत असते. या परिसराच्या सभोवताल िंहदू देवी—देवतांची अनेक मंदिरे आहेत.
तेलनखेडी शिव मंदिर, नागपूर
श्री शांतीनाथ जैन मंदिर, रामटेक, नागपूर : रामटेक याच नावाने गावाबाहेर वसलेले रामटेक हे प्राचिन स्थळ श्री शांतीनाथ दिगंबर जैन अतिशया क्षेत्र या नावाने ओळखले जाते. यात 15 मंदिरांचा समावेश असून, हा संपूर्ण परिसर िंभतीने वेढलेला आहे. भगवान शांतीनाथांची मूर्ती शांतीनाथ मंदिरात आहे. या मंदिरात आलेल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी या मंदिराची महंती आहे. कवी कालीदासांनी आपल्या मेघदूत या काव्यातही रामटेकचे वर्णन केलेले आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी एकदा भेट दिली असे म्हणतात, आणि म्हणूनच या परिसराचे नाव रामटेक असे पडले.
याबाबत अशी कथा आहे की, नागपूरचे राज्यकर्ते अप्पासाहेब भोसले आपले मंत्री वर्धमान सवाजी यांच्यासोबत सुमारे 400 वर्षांपूर्वी रामटेकला आले होते. श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सवाजी यांना आपल्यासोबत जेवण करायला बोलावले. पण, जैन असलेले सवाजी यांनी आपल्या देवाच्या दर्शनाआधी जेवण करण्यास नकार दिला. त्यामुळे भोेसले यांच्या आदेशानुसार त्यांच्या धार्मिक स्थळाचा शोध सुरू झाला. एका झाडाच्या खाली भगवान शांतीनाथ यांची मूर्ती आढळून आली. या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सवाजी यांनी जेवण घेतले. जिथे भगवान शांतीनाथाची मूर्ती आढळून आली, त्याच ठिकाणी जैन मंदिर बांधण्याचे आदेश अप्पासाहेब भोसले यांनी दिले. जवळच्या एका टेकडीवर रामाचे मंदिरही बांधण्यात आले.
श्री शांतीनाथ जैन मंदिर, रामटेक, नागपूर
ड्रॅगन पॅलेस विहार, कामठी, नागपूर: नागपूरजवळील कामठी येथे असलेले ड्रॅगन पॅलेस हे बौद्धांचे विहार असून, तथागत बुद्धाला ते अर्पण करण्यात आले आहे. हे विहार शिल्पकृतीचे असाधारण प्रतीक आहे. जपानच्या मदर नोरिको ओगावा सोसायटीने या विहारची स्थापना केली.
अद्वितीय कलाकृतीचे हे एक सर्वोत्तम प्रतीक आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेले नागपूरजवळच्या कामठी येथील हे सर्वात लोकप्रिय स्थळ आहे. जपानच्या ओगावा सोसायटीच्या मॅडम नोरिको ओगावा यांनी ड्रॅगन पॅलेस विहारच्या बांधकामात मोठे आर्थिक योगदान दिले असल्याने नागपूर जिल्हा हा भारत—जपान मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. नागपूरचे लोटस मंदिर अशीही या विहारची ओळख आहे. हिरवळ, रंगिबेरंगी फुलांचा बगिचा आहे. यामुळे हा परिसर सुशोभित आणि आल्हाददायक झालेला आहे. या विहाराच्या िंभतींना पांढरा शुभ्र रंग देण्यात आला असून, तो शांतता, समानता आणि धर्माचे प्रतीक आहे.
ड्रॅगन पॅलेस विहार, कामठी, नागपूर
श्री साईबाबा मंदिर, वर्धा रोड नागपूर: शिर्डीच्या साईबाबांना अर्पण करण्यात आलेले हे मंदिर नागपुरातील वर्धा मार्गाला लागून असलेल्या विवेकानंद नगर परिसरात वसलेले आहे. साईबाबा हे योगी आणि फकीर होते. भगवान कृष्णाचा अवतार म्हणून िंहदू भाविक त्यांची श्रद्धेने पूजा करतात. इस्लाम भाविक त्यांना मुस्लिम फकीर म्हणून ओळखतात. असे म्हणतात की, या मंदिरावर साईबाबांचे आर्शीवाद आहेत. या मंदिरात दररोज सुमारे दोन हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. पण, गुरुवारी भाविकांची संख्या 25 हजारांच्या घरात जात असते.
श्री साईबाबा मंदिर, वर्धा रोड नागपूर
श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर, कोराडंी नागपूरच्या उत्तरेकडे 15 किलीमीटर अंतरावर कोराडी तलावाच्या किनार्यावर हे मंदिर वसलेले आहे. देवी महालक्ष्मीला अर्पण करण्यात आलेले हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात सर्वच नऊ दिवस या मंदिरात दिवस—रात्र भाविकांची अलोट गर्दी असते. या काळात रात्रीच्या सुमारास सुमारे 50 हजार दीप जळत असतात.
श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर, कोराडंी
धापेवाडा विठोबा मंदिर, नागपूर चंद्रभागा नदीच्या किनार्यावर धापेवाडा हे गाव आहे. विठोबाचे मंदिर हेच या गावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या मंदिरातून संपूर्ण नदीचे सौंदर्य न्याहाळता येते. राजा बाजीराव भोसले यांचे दिवान उमाजी आबा यांनी हे मंदिर स्थापन केले आहे. विदर्भाची पंढरी म्हणूनही धापेवाडाची ओळख आहे.
धापेवाडा विठोबा मंदिर, नागपूर
आदासा गणपती मंदिर, नागपूर : सावनेर—कळमेश्वर मार्गावर नागपूरच्या वायव्येकडे 43 किलोमीटर अंतरावर असलेले आदासा हे अतिशय लहानसे गाव. अनेक प्राचिन आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी हे गाव प्रख्यात आहे. अतिशय प्राचिन आदासा गणपती हे येथील मुख्य मंदिर आहे. अष्टविनायकापैकी एक अशी या मंदिराची ओळख आहे. 12 फूट उंच आणि 7 फूट व्याप्ती असलेला आदासा गणपती स्वयंभू प्रगट झाला असल्याचे म्हटले जाते. या मंदिराशिवाय, सुमारे 10 हेक्टरच्या या परिसरात आणखी 20 लहान मंदिरेही आहेत. गावाला लागूनच एक टेकडी आहे आणि त्यावर महादेवाचे मंदिर आहे. यात तीन स्वयंभू लिंग असून, ती जमिनीतून वर आली असल्याचे बोलले जाते.
आदासा गणपती मंदिर, नागपूर
श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, नागपूर :नागपूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर सेंेट्रल एव्हेन्यू मार्गावर असलेले हे मंदिर भगवान श्रीराम आणि भगवान महादेवाला समर्पित आहे. राम मंदिरात भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. जमनाधर पोद्दार यांनी 1923 मध्ये या मंदिराची स्थापना केली आहे.
या मंदिराचे जो कुणी दर्शन घेईल, त्यांच्या मनाला शांतता मिळते, या विश्वासाने देशाच्या कानाकोपर्यातून भाविक या मंदिरात येत असतात. या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, रामनवमीच्या दिवशी या मंदिरातून निघणारी भव्य शोभायात्रा होय.
श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, नागपूर
टेकडी गणपती मंदिर, नागपूररेल्वे स्थानकाजवळ असलेले हे गणपती मंदिर हे नागपुरातील अतिशय प्राचिन आणि लोकप्रिय मंदिर आहे. हे मंदिर टेकडंीवर बांधण्यात आले असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरच्या राजे भोसले यांनी हे मंदिर बांधले असून, ते सुमारे 250 वर्षे जुने असल्याचे समजते.
टेकडी गणपती मंदिर, नागपूर
दीक्षा भूमी, नागपूर :जगभरातील बौद्ध बांधवांचे हे अतिशय पवित्र आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 3 लाख 80 हजार अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोद्ध धम्म स्वीकारला होता. त्यांनी स्वीकारलेली ही दीक्षा आजही देशातील असंख्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.
भारतातील भीमबांधवांसाठी दीक्षाभूमी हे श्रद्धास्थळच आहे. प्रत्येक वर्षी अशोक विजया दशमी आणि 14 ऑक्टोबर रोजी (बाबासाहेबांनी दीक्षा स्वीकारली तो दिवस) येथे लाखो बौद्ध बांधव भेट देत असतात. या जागेवर भव्य स्तूप उभारण्यात आलेला आहे.
जागेत बौद्धधमांची दीक्षा स्वीकारतात, ती जागा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन जागांपैकी एक म्हणजेदीक्षाभूमी असून, दुसरी म्हणजे, मुंबईतील चैत्य भूमी आहे. अतिशय सुंदर असे वास्तूशिल्प आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे संपूर्ण जगात दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे. भारतातील पर्यटकाचेही हे मुख्य केंद्र आहे.
दीक्षा भूमी, नागपूर
गड मंदिर (राम मंदिर), रामटेकरामटेक येथे भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासाच्या काळात श्रीरामांनी ज्या—ज्या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती, त्यातील एक स्थळ म्हणजे रामटेक आहे, असे म्हटले आहे. रामटेकच्या जवळच महान अगस्त्य ऋषींचे आश्रम होते, अशीही आख्यायिका आहे. या आश्रमात ऋषी तप करायचे आणि राक्षस त्यांची तपश्चर्या उद्ध्वस्त करायचे. भगवान श्रीरामांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण श्रृष्टी राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली.
स्थानिक भाषेत टेकचा अर्थ प्रतिज्ञा असा होत असल्यामुळे या जागेला रामटेक असे नाव पडले आहे. त्यामुळे असे म्हटले जाते की, रामटेक येथे जो कुणी प्रतिज्ञा घेत असतो, त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत असते. अनेक शतकांपासून येथे श्रीरामाच्या पादुका पूजेसाठी ठेवल्या जातात, असेही म्हटले जाते.
िंछदवाड्यातील देवगड किल्ला सर केल्यानंतर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनंी या मंदिराची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळेही या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसूनच कालिदासांनी ‘मेघदूतम’ लिहिले आहे. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढविली होती.
गड मंदिर (राम मंदिर), रामटेक
श्रीक्षेत्र शिवमंदिर, अंभोरा, नागपूर :नागपूरच्या पूर्वेकडे सुमारे 74 किलोमीटर अंतरावर असलेले अंभोरा हे गाव कुही तालुक्यातील वैनगंगा नदीवर वसलेले आहे. अंभोरा गावचे वैशिष्ट म्हणजे, येथे असलेले प्रसिद्ध चैत्यनेश्वराचे अर्थातच हरिनाथाचे मंदिर होय. भगवान शिवाला आणि िंहदू संत हरहर स्वामी यांची समाधी आहे.
श्रीक्षेत्र शिवमंदिर, अंभोरा, नागपूर
जामा मशिद, नागपूर: नागपुरातील मोमिनपुरा भागात ही मशिद आहे. या भागातील ही सर्वात मोठी मशिद आहे. मध्यभागी मोठा कळस आहे. मागील बाजूला दोन लहान आणि दोन मोठे मनोरे आहेत. उत्तरेकडे मशिदीच्या समोर बगिचा आहे.
जामा मशिद, नागपूर
रामधाम, तालुका रामटेक:रामटेकमध्ये भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. वनवासात असताना प्रभू श्रीरामांनी रामटेक येथे काही काळ विश्रांती घेतली होती, असे म्हटले जाते. नागपूरपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामटेकजवळील मन्सर येथे असलेले रामधाम हे भारतातील पहिले आणि एकमेव धार्मिक पर्यटन स्थळ ठरले आहे. देशभरातील धार्मिक यात्रा करू न शकणार्या गरीब व्यक्तीला एकाच ठिकाणी देशभरातील धार्मिक स्थळांचे दर्शन घेणे शक्य व्हावे, या कल्पनेने रामधामची निर्मिती करण्यात आली आहे. येथे येणार्याला मानसिक शांतता मिळते. देशातील सर्व तीर्थ विदर्भ आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या छत्रछायेत येथे एकत्र आणण्यात आले आहेत. याशिवाय, भारतातील 12 ज्योेतिर्लिंग, माता वैष्णोदेवीचे मंदिरही येथे असलेल्या मनुष्यनिर्मित चंद्र पर्वतावर पाहायला मिळते.
जगातील सर्वात मोठे 350 फूट लांब ‘ॐ’ हे रामधामचे प्रमुख वैशिष्ट आहे. या ॐ च्या आत चित्रस्वरुपात रामायण पाहायला मिळते. तर बाहेर कृष्णलीलाचे वर्णन आणि हनुमान, साईबाबा व गजानन महाराजाची मूर्ती आहे.
रामधाम, तालुका रामटेक
ऑल संत कॅथेड्रल चर्च : नागपूरचा मध्यवर्ती भाग असलेल्या सदरपासून दोन किलोमीटर अंतरावर बिशप कॉटन स्कूलजवळ हे चर्च आहे. 19 शतकातील गोथिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेले हे चर्च उत्तर भारतातील कॅथेड्रल चर्च आहे. लेफ्ट. जनरल सर रिचर्ड हेराम सांके यांनी 1851 मध्ये संगेमरमरचा वापर करून या अद्भूत चर्चची स्थापना केली होती. यानंतर 1879 मध्ये ब्रिटीश शिल्पकार जी. एफ. बॉडली यांनी व्याप आणि परिसर वाढवून या चर्चची फेररचना केली. ऑल संत कॅथेड्रल चर्च हे नागपुरातील सर्वात आकर्षक असे चर्च असून, येथील खिडक्या आणि त्यांना असलेली तावदाने बाहेरून जाणार्यांचेही मन वेधून घेतात. आर्ट अॅण्ड कॉमर्स कॉलेजला हिस्लॉप कॉलेज असे नाव देण्यात आले असून, येथील प्रख्यात मूर मेमोरिअल हॉस्पिटरचा कारभारही याच चर्चच्या माध्यमातून चालत असतो.
ऑल संत कॅथेड्रल चर्च