अर्थव्यवस्था
भारतातील महानगर आणि धनाढ्य लोकांचे शहर म्हणून नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून नागपूर हे विदर्भातील मुख्य व्यावसायिक केंद्र राहिले आहे. येथे अनेक महत्त्वाची व्यापारी केंद्रे आहेत. इन्स्टिट्युट फॉर कॉम्पिटेटीव्हनेसने आपल्या 2012 च्या अहवालात नागपूर शहराला देशातील अकरावे आघाडीचे स्पर्धात्मक शहर असा दर्जा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय नागपुरात असल्याने बँकींग क्षेत्रासाठीही हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे. 10 सप्टेंबर 1956 रोजी रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक कार्यालय येथे स्थापन झाले होते. रिझर्व्ह बँकेच्या नागपुरात दोन शाखा आहेत. यातील एका शाखेत भारतातील संपूर्ण सोन्याचा साठा ठेवण्यात आला आहे.
नागपूरचे हृदयस्थान समजल्या जाणा-या मध्य नागपुरात सीताबर्डी बाजारपेठ आहे. शहरातील ही मुख्य व्यावसायिक बाजारपेठ मानली जाते. याशिवाय, इतवारी, महाल आणि कळमना येथे मोठ्या प्रमाणात लहान बाजारपेठा असून, खरेदीसाठी त्या प्रसिद्ध आहेत.
बुटीबोरी ओद्योगिक वसाहत ही आकारमानाच्या तुलनेत आशियातील सर्वात मोठी वसाहत मानली जाते. येथील सर्वात मोठा औद्योगिक घटक म्हणजे इंडो रामा सिंथेटिक्स होय. या औद्योगिक वसाहतीतील अन्य घटकांमध्ये ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील महिंद्रा ्र अॅण्ड महिंद्रा देशातील सर्वात मोठा कास्टींग ग्रुप असलेली निको लिमिटेड, बजाज ऑटो, कॅन्डिको, अजंटा टूथब्रश आणि सनविजय उद्योग समुह आदींचा समावेश आहे. आईसक्रिम उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली दिनशॉ ही मूळची नागपूरचीच आहे. याशिवाय, सुकामेव्याचे निर्माते हल्दिराम तसेच आयुर्वेदिक उत्पादनांची कंपनी विको आणि बैधनाथ या कंपन्याही नागपूरच्याच आहेत.
मोठे आणि मध्यम उपक्रम : सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या उपक्रमांसोबतच अन्य मोठे आणि मध्यम उपक्रम खालीलप्रमाणे आहेत :—
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर
- मॉईल, नागपूर
- आयुध निर्माणी कारखाना, नागपूर
- एम. एस. ई. बी., नागपूर
- महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन लिमिटेड, नागपूर
- इस्पात इंडस्ट्रीज लिमिटेड, नागपूर
- रिलायन्स पॉलिस्टर्स, मौदा, नागपूर
- इंडोरामा िंसथेटिक्स (इं) लिमिटेड, नागपूर
- फार्महाऊस बिस्किट कंपनी लिमिटेड, नागपूर
- FACOR, Nagpur
- Dinshaw Dairy, Nagpur.
- VIP Industries Ltd, Nagpur>
- Mahindra and Mahindra Ltd, Nagpur
- Sunflag Iron and Steel Co. Ltd, Nagpur
- ACC Nihon Castings Ltd, Nagpur
- Noga Factory, Nagpur
- Associated Cement Companies Ltd, Nagpur.
- Lloyds Metals and Engg. Ltd, Nagpur
- Lloyds Steel Industries Ltd, Nagpur
- Woodworth India Ltd, Nagpur.
- Central Railway, Nagpur
- S.E. Railway, Nagpur
- Bakeman’s Industries Ltd, Nagpur
- Murli Agro Products Ltd, Nagpur
- Shakti Press Ltd, Nagpur
- NTPC, Nagpur
- Perfect Spinners Ltd
- SKG Refractories Ltd, Nagpur.
आयसीडी नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कार्गो वाहतुकीकरिता भारतीय उपखंडासाठंी नैसर्गिक लॉजिस्टीक हब बनले आहे. नागपुरातील झिरो माईल ही केवळ भौगोलिक सत्यताच नसून, लॉजीस्टिक पायाभूत सुविधांचे केंद्रही आहे. देशाच्या रेल्वे आणि रस्ता वाहतूक नेटवर्कचे हे शहर एक केंद्रही आहे. कॉन्कर्सचे (सीओएनसीओआर) इनलँड कंटेनर डेपो नागपूरच्या नरेंद्र नगर भागातील सेंट्रल रेल्वेच्या अजनी मार्शिंलग यार्डजवळ आहे. रेल्वेने याचा संबंध ईस्ट—वेस्ट आणि नॉर्थ—वेस्टशी जोडला गेला असल्याने येथून भारताच्या सर्वच भागांमध्ये रेल्वे नेणे शक्य झाले आहे. येथील रिंग रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (मुंबई ते कोलकाता) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांत 7 शी (वाराणसी ते कन्याकुमारी) जोडला गेला आहे.
फळ प्रक्रिया उद्योग -संत्र्यावर आधारित उद्योग :— संत्र्यांच्या उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराची ओळख देशात ‘संत्रा नगरी’ अशी असल्यामुळे संत्रा उत्पादनावर आधारित लघू उद्योग स्थापन करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात बराच वाव आहे. नागपूर जिल्ह्यातील खालील तहसिलींमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. यात नागपूर ग्रामीण भागातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, भिवापूर आणि कारंजाचा समावेश आहे. या भागात उत्पादित होणारा संत्रा देशाच्या विविध भागातील बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. प्रक्रिया केलेला संत्रा निर्यातीकरिता योग्य राहात असल्याने नागपूर जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया युनिट उभारण्याबाबत विचार करता येऊ शकतो. येथे संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यास बराच वाव आहे. काटोल, नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यात अशा प्रकारचे उद्योग उभारले जाऊ शकतात.
तेल उद्योग:नागरिकांच्या ढासळत्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर सोयाबिनवर आधारित उत्पादन घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात सोयामिल्क, सोया वडी, सोयाबिन तेल, सोया बिस्कीट आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे. सोयाबिनचा वापर जनावरांच्या खाद्याचे उत्पादन करण्याकरिताही केला जाऊ शकतो. यामुळेच नागपूर जिल्ह्यात सोयाबिन उद्योग स्थापन करण्यास बराच वाव आहे.
नागपूर जिल्ह्यात उपलब्ध असलेली संसाधने
या संसाधनांचे खालील गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
Material resources :
1) कृषी:नागपूर जिल्हा हा मुळातच कृषी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो आणि येथील ग्रामीण अर्थव्यवस्था ही जिल्हा अर्थव्यवस्थेचा आधार आहे. या जिल्ह्याचा एकूण भौगोलिक प्रदेश 9892 किलोमीटर इतका असून, यातील 644 हेक्टर भाग पिकाऊ आहे. या जिल्ह्यातील मुख्य पिके धान, जवार, कापूस, तूर आणि सोयाबिन आहे.
तक्ता अ
मुख्य पिकांची उत्पादन व उत्पादकता
अनु क्र . | पीक | क्षेत्र ‘00’ हेक्टर मध्ये | उत्पादन ‘00’टन | उत्पादकताकिग्रा/हे |
2009-2010 | 2011-2012 | 2008-2009 | ||
1 | भात | 646 | 1466 | 1419 |
2 | सोयाबीन | 2779 | 1411 | 823 |
3 | गहू | 636 | 1073 | 1191 |
4 | शेंगदाणा | 43 | 23 | 670 |
5 | ज्वारी | 259 | 60 | 305 |
6 | कापूस | 7454 | 213 | 250 |
7 | तूर | 294 | 466 | 532 |
8 | हरबरा | 394 | 611 | 734 |
फुलोत्पादन : रोखीचे पिक घेण्याची संकल्पना झपाट्याने रूढ होत गेल्याने या जिल्ह्यात विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादनही सातत्याने वाढत गेले. विविध सण आणि उत्सवांच्या काळात फुलांनी सुशोभित करण्याची समाजाची मानसिकताही वाढू लागली आहे. फुलोत्पादनात एकूण 22742 हेक्टर इतकी जमीन उपयोगात आणण्यात आली आहे. गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंधा, ग्लॅडिओलाय, पांढरी लिली, गोल्डनरॉड, डेझी, मोगरा यासारख्या फुलांचे एकूण 1365.53 मेट्रिक टन इतके उत्पादन घेतले जाते. कॅमोमाईल, गुलाब, मोग्रा, लिली आणि मॅरिगोल्ड यासारख्या फुलांचे उत्पादन ओद्योगिक उपयोगासाठी नागपूर जिल्ह्यात घेतले जाऊ शकते. पर्फ्युम, गुलाबजल आणि गुलकंदच्या निर्मितीसाठी या फुलांचा वापर होऊ शकतो.
जमिनीचा वापर : जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 986000 हेक्टर असून त्यापैकी 159000 हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे ,644000 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे.जिल्ह्यातील जमिनीचा वापर तक्ता ब मध्ये दर्शविलेला आहे .
तक्ता ब
जमिनीचा वापर
अनु क्र | वर्गवारी | क्षेत्र ‘000’ हेक्टर मध्ये |
1 | एकूण भौगोलीक क्षेत्र | 986 |
2 | वन जमीन | 159 |
3 | पडीत जमीन | 128 |
4 | गैरकृषी वापर | 121 |
5 | पिकाखालील क्षेत्र | 644 |
खनिज संसाधने:नागपूर जिल्हा हा खनिज, कोळशाचे साठे, मँगनिझ, डोलोमाईट, लाईमस्टोन, लोखंड, क्ले, कॉपर, क्रोमाईट्स, जस्त, तुंगस्थ आदी कच्च्या खनिजांनी समृद्ध आहे. या जिल्ह्यात ही खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्याच्या उत्तर—पश्चिम पट्ट्यात अर्थातच सावनेर ते कन्हान या भागात कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उमरेड तहसिलीतही उच्च दर्जाचा कोळसा आढळून येतो. नागपूर जिल्हा हा कच्च्या मँगनिजने समृद्ध आहे. कच्च्या मँगनिझच्या उत्पादनाने संपूर्ण देशात जिल्ह्याला अतिशय महत्त्व आहे. कच्चे मँगनिझ हे प्रामुख्याने रामटेक आणि सावनेर तालुक्यात आढळून येतात. कांद्री आणि देवलापार येथे चांगल्या दर्जाचे लाईमस्टोन आढळून येतात. नागपूर जिल्ह्यात मिका आणि तुंगस्थाचे साठेही आढळून येतात. इमारती बांधण्याकरिता जी उच्च दर्जाची वाळू आवश्यक असते, ती कन्हान नदीत आहे.
तक्ता क (भाग एक)
खनिज उत्पादन 2006-2007
अनु क्र | खनिज | उत्पादन (MT) | मुल्य (लाखात ) | खणी पट्याची संख्या |
1 | मंगनीज ओर | 202804 | 5433.26 | 34 |
2 | कोळसा | 8512081 | 84029.42 | 27 |
3 | डोलोमाइट | 43207 | 60.66 | 15 |
4 | पांढऱी माती | 200 | 0.12 | 0.2 |
5 | स्पटिक | 80 | 0.05 | 01 |
6 | रेती | 664571 | 835.96 | 01 |
तक्ता क (भाग दोन)
नागपूर जिल्यातील खनिज साठे
अनु क्र | खनिज | साठे दशलक्ष टन |
1 | कोळसा | 1183.395 |
2 | लाईम स्टोन | 31.000 |
3 | मंगनीज ओर | 9.389 |
4 | डोलोमाइट | 28.740 |
5 | माती | 3.555 |
6 | कॉपर ओर | 1.300 |
7 | टनस्टन ओर | 19.980 |
8 | झिंक ओर | 8.270 |
9 | क्रोमाईटस | 0.056 |
10 | ग्रेनाईटस (Million Cubic mt.) | 4.880 |
वन:2005—06 या वर्षाच्या काळात एकूण भूभागापैकी 2180 चोरस किलोमीटरचा प्रदेश वनक्षेत्रातर्ंगत होता. जंगलाचा बहुतांश भाग रामटेक तहसीलच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पेंच नदीच्या किनारपट्टी भागात आढळून येतो. जंगलाचे प्रामुख्याने तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. यात राखीव, संरक्षित आणि अवर्गिकृत वनांचा समावेश आहे.
तक्ता ड
अनु क्र | वर्गवारी | क्षेत्र चौ की मी |
1 | आरक्षित वने | 1387 |
2 | संरक्षीत वने | 832 |
3 | अवर्गीकृत वने | 304 |
एकूण | 2523 |
मुख्य व गौण वन उपज 2005- 2006
तक्ता ई
अनु क्र | वन उपज | उत्पादन | विक्री मुल्य ‘000’मध्ये |
अ ) मुख्य वन उपज | |||
1 | इमारती लाकूड (m3) | 1.613 | 17820 |
2 | जळाऊ लाकूड (m3) | 6.969 | 6774 |
ब ) गौण वन उपज : | |||
3 | बांबू (Nos.) | 13702 | 127.85 |
4 | तेंदू पत्ता (S.B.) | 38408 | 31405.74 |
5 | डींक (क्विंटल l) | 12 | 65.70 |
6 | इतर | 10 | 14.40 |
मत्सोद्योग: नागपूर जिल्ह्यातील एकूण भौगोलिक भूभागापैकी 15037 हेक्टर इतका भाग मत्सोद्योगासाठी वापरला जाऊ शकतो. 650 किलीमीटरचा प्रदेश हा नदीच्या पाण्याखाली आहे. 2005—06 या कालावधंीत नागपूर जिल्ह्यातील मत्स उत्पादन 8310 मेट्रिक टन इतके होते. हा व्यवसाय सुमारे 2070 लाख रुपये इतका होता. ते पाहू जाता महाराष्ट्र सरकारने मत्स व्यवसायाकरिता विविध विकासात्मक योजना/प्रकल्प हाती घेतले.
रेशम उद्योग: रेशम उद्योग हा भारतातील जैविक—कृषी उद्योग होय. फार जुन्या काळापासून हा उद्योग करण्यात येत आहे. कच्च्या सिल्क उत्पादनात भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे.
व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या सिल्कच्या सर्व तिन्ही उत्पादनाचे वितरणही भारत करीत असतो. यात मलबेरी, तस्सार आणि इरी—मुर्गा या जातींचा समावेश आहे. ताज्या अहवालानुसार, मलबेरी आणि तस्सारच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे भारतात तिसर्या क्रमांकावर आहे. नागपूर जिल्ह्यात रेशम उद्योगांतर्गत सध्या 141.00 हेक्टर इतका भूभाग येतो. हा भाग नागपूर, कळमेश्वर, काटोल, नरखेड आणि रामटेक परिसरात येतो.